RSS

Welcome to my Blog
Hope you enjoy reading.

शनिवार, २५ डिसेंबर, २०१०

असं - तसं !




कधी रडणं, कधी हसणं.
कधी झुरणं, कधी सरणं.

कधी बोलणं, कधी गप्प राहणं.
कधी फुलणं, कधी कोमेजणं.

कधी बरसणं, तर कधी तरसणं.
कधी वाहणं, तर कधी गोठणं.

तुला आठवणं, तुला विसरणं.
तुला विसरुन पुन्हा आठवणं,

तुला आठवत जागणं, तुला आठवत झोपणं,
(नाही फक्त जागणंच!)

तुला बघणं, तुला मनात भरणं.
तुला हरवणं, तुला शोधणं.

तुला खुप काही सांगणं, तुझं काही ऐकणं.
तुला काही देणं, तुझ्याकडे काही मागणं,

तुझ्याशी भांडणं, अबोला धरणं.
तू मनवायला आल्यावर, जरा भाव खाणं.

तुझी वाट बघणं, तुला वाट बघायला लावणं.
तुझ्या डोळ्यांत डुंबणं, तुझ्या ओठांवर तरंगणं!

तुझ्या मिठीत जगणं, तुझ्या मिठीत मरणं.
तू असताना असणं, तू नसताना माझी मी नसणं!

काही नाही रे!
हे असं होतयं तुझ्या प्रेमात पडल्यापासनं! :)

2 टिप्पणी(ण्या):

सारिका म्हणाले...

तुला जरा जास्तच कळायला लागलं आहे बाबा..
तिच्या मनातलं...

Deepak Parulekar म्हणाले...

आभार मॅडम! बरचंस नाही कळत गं! जे कळत ते शब्दांत मांडायचा प्रयत्न करतोय! होप, जे लिहितोय ते तिच्याह मनातलं असावं ! :)

टिप्पणी पोस्ट करा