काही स्वप्ने तुझी
घेउन फिरते मी अनवाणी
आठवांचा रुतता काटा
ह्रदय गाते विरहाची गाणी.
आठवणी अशा विशाल
आकाशासारख्या
थांग न लागणार्या
सागरासारख्या
नाचुन, बागडुन, थकलेल्या
वार्यासारख्या
कशी आवरु
कशी कुणाला
माझे मी नसते
तू समोर नसताना!
कधी नव्हे ते शब्दांचे वेड
असे लावून मला,
एकाकी सोडलंस
स्वप्नांच्या मुलुखात मला.
कधी येशील परत
आता आभाळही कोरडे झाले,
आसवांच्या माझ्या
असे विशाल समुद्र झाले!