RSS

Welcome to my Blog
Hope you enjoy reading.

मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

मिठी

क्षण, दोन क्षण त्याच्या मिठीतले माहीत नाही, त्याला काय काय सांगायचं असतं! मी ही बिलगून राहते तशीच.. माहीत नाही, मला काय काय जाणून घ्यायचं असतं!
- इंद्रायणी

गुरुवार, ३० डिसेंबर, २०१०

मीरा



अशी आर्तने मीरेची,
कधी पडली का तुझ्या कानी

होउनी धुंद, लाविला छंद
तुझ्या प्रीतीने माझिया मनी.

एक तुझीच मुर्ती, भरुनी नयनी
फिरते वैराणी, होउन दिवाणी.

जाहले सरिता, वाहिले जरी का
न मिळाली यमुना, तुझ्या प्रितीची.

राधा न जरी, श्रद्धा ही तरी
प्रेमावर माझ्या, माझीच सारी.

छेडुनि तारा, गायले तराणे
वाहिल्या धारा, संदिग्ध स्वराने.

होउनी वारा, जरा स्पर्शुनी जा ना
तरसली मीरा, जरा बरसुनि जा ना !