गुरुवार, १३ जानेवारी, २०११
गा ना एक अंगाई
गा ना एक अंगाई,
किती रात्री अशाच जागुन काढल्यात,
कानात साठवलेली तुझी अंगाई आठवुन!
गा ना एक अंगाई,
किती रात्री अशाच जागुन काढल्यात,
थोपटवणार्या तुझ्या स्पर्शाला आठवुन!
गा ना एक अंगाई,
किती रात्री अशाच जागुन काढल्यात,
उशीला तुझी मांडी समजुन!
गा ना एक अंगाई,
किती रात्री अशाच जागुन काढल्यात
डोळ्यातले पाणी डोळ्यातच गोठवून!
गा ना एक अंगाई,
किती रात्री अशाच जागुन काढल्यात
तुझ्या स्वप्नांना जागेपणी बघुन!
गाशील एक अंगाई?
आता रात्री जागवत नाहीत रे मला!
ये ना एकदा, गात ती अंगाई
झोपायचयं निवांत, तुझ्या कुशीत मला!