गुरुवार, १३ जानेवारी, २०११
गा ना एक अंगाई
गा ना एक अंगाई,
किती रात्री अशाच जागुन काढल्यात,
कानात साठवलेली तुझी अंगाई आठवुन!
गा ना एक अंगाई,
किती रात्री अशाच जागुन काढल्यात,
थोपटवणार्या तुझ्या स्पर्शाला आठवुन!
गा ना एक अंगाई,
किती रात्री अशाच जागुन काढल्यात,
उशीला तुझी मांडी समजुन!
गा ना एक अंगाई,
किती रात्री अशाच जागुन काढल्यात
डोळ्यातले पाणी डोळ्यातच गोठवून!
गा ना एक अंगाई,
किती रात्री अशाच जागुन काढल्यात
तुझ्या स्वप्नांना जागेपणी बघुन!
गाशील एक अंगाई?
आता रात्री जागवत नाहीत रे मला!
ये ना एकदा, गात ती अंगाई
झोपायचयं निवांत, तुझ्या कुशीत मला!
4 टिप्पणी(ण्या):
अप्रतिम...मला आता या अंगाईवालीचा हेवा वाटयाला लागला रे..
लवकर लग्न करून घरात आण तिला..मग काय रोजच अंगाई...
मज्जा मज्जा...
साल्या तू अंगाई ऐकल्यावर डारडूर झोपत असशील..आणि घोरत असशील..म्ह्णुन पळून गेली असेल बिच्चारी...
तु का माझ्या लग्नाच्या मागे लागलीस? आयला मला सुखात बघवत नाही का!
इथे लग्न करायला सांगते आणि मी घोरतो म्हणुन माझी बदनामी पण करते, आयला हे वाचुन कुणी मुलगी लग्नाला तयार होईल का?? काय ना तु पण ! :)
विदुशक बनून दुसऱ्याच्या संसाराचे रंग उडवले तर अंगाई एकुन पण झोप नाही येणार......
टिप्पणी पोस्ट करा