जुनी पाने चाळता चाळता
हरवलेल्या वाटा दिसत राहतात
ओळी काहिश्या पुसट झालेल्या`
तरी अजुन तुझी वाट पाहतात..
कूठल्याश्या वाटेवर सांडलेला पारिजात
अवचित देहभर पसरत जातो
तुझ्या असण्याचे भास
का मनाला देउन जातो
तू दुर;
कुठे तरी हरवलेला
तोडुन स्वप्ने माझी
स्वत: विखुरलेला.
दिवसा मला भान नसत माझं
रात्र फार छळते रे!
तू असावास ह्रदयाशेजारी
कण कण जेव्हा मी जळते रे !
4 टिप्पणी(ण्या):
आवडली कविता
आभार मित्रा !!
तू तिच्या ह्र्दयातलं इतक छान कसं ओळखू शकतोस?
ती आणि मी वेगेळे नाहीत! म्हणुन असेल कदाचित !
टिप्पणी पोस्ट करा