सार्या विश्वाची आसवे पुसणार्या हे सिद्धार्था,
कधी माझ्या पापण्यातले पाणी दिसले का तुला?
सार्या विश्वाला प्रेमाने न्हाउ घालणार्या हे भगवान बुध्दा,
कधी माझं प्रेम कळलं नाही का तुला?
एका भयाण मध्यरात्री
माझा आणि बाळाचा त्याग करुन,
साधा निरोपही न घेता
तू निघुन गेलास!
तुला काय वाटलं मी चिरनिद्रेत होते?
त्या मोरपीसी शय्येवर सुखाने लोळत होते?
अर्धवट पापण्यानी मी तुला पाहत होते,
तुझी मुर्ती डोळ्यांतुन मनात साठवत होते!
तू थांबशील, मला पाहुन, निदान बाळाला पाहुन
माझी वेडी आशा, माझं वेडं प्रेम!
तुझं अखेरचं चुंबन!
मी तसंच जपुन ठेवलयं!
माझ्या केसांवरुन फिरलेला तुझा हात
मी तस्साच जपुन ठेवलाय!
तुझ्या चेहर्यावरचे विरहाचे दु:ख मला व्यथित करतेय!
एकदा अखेरचे तुझ्या मिठीत विरुन जावेसे वाटते
माझी आसवेही तेव्हा तुझ्यासारखीच कठोर झालेली.,
माझे स्वरही तेव्हा तुझ्यासारखेच मुक झालेले.
पण बरं केलंस नाही निरोप घेतलास,
कदाचित मी तुझा निरोप घेउ शकले नसते!
माझ्या आसवांच्या नद्यानी तुझा मार्ग रोखला असता!
माझ्या प्रेमाच्या सागराने तुझ्या मनाला भरती आणली असती!
मी जाणते,
जेव्हा परत येशील तेव्हा तू माझा सिद्धार्थ नसशील!
सार्या जगाला प्रेमाने भरुन टाकणारा बुद्ध असशील!
तेव्हा तू मला ओळखशील का रे?
जा!
विश्वाला तुझी गरज आहे!
भयाण्,गांजलेल्या, पिडलेल्या आत्म्यांना
तुझ्या मायेची गरज आहे!
पण,
.
.
.
मलाही तशीच आहे रे!
- इंद्रायणी
14 टिप्पणी(ण्या):
दीपक, जब्बरदस्त... खुपच सुंदर.. !!
धन्यवाद हेरंब!
अप्रतिम..स्तुती करायला माझ्याजवळ शब्द नाहीत..आजही मला प्रश्न पडलाय..तुला तिच्या मनातलं इतकं छान कसं कळतं...?
सुंदर!
या प्रसंगावर हिंदीमध्ये मैथिलीशरण गुप्तंची एक कविता आहे. कवितेतला भाव काहीसा वेगळा आहे, पण ती शेअर करायचा मोह आवरत नाहीये : http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A4%BF_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%B8%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%B9_%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87_/_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4
धन्यवाद गौरी!
पण लिंक दिसत नाही गं !! परत दे ना !
दीपक, खालची संपूर्ण URL ब्राउझरमधे कॉपीपेस्ट करून बघ ... मला लिंक टाकता येत नाहीये.
http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A4%BF_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%B8%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%B9_%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87_/_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4
धन्यवाद गौरी!
छान आहे रे ती कविता!
सारिका: माहित नाही गं कसे ते पण कळत थोडे थोडे !! :)
वाह मित्रा...सुंदर शब्द.
आवडली खूप खूप आवडली... :)
आभार सुहास! अनेक आभार !!
खूप सुंदर...!!!
धन्यवाद मैथिली !
खूपच छान कविता.
अशीच एकदा रामायणातील उर्मिलेची मनातील
कविता पण येवू दे.
धन्यवाद रवींद्रजी !
टिप्पणी पोस्ट करा