आपल्या प्रत्येक भेटीत
एक नवा जन्म घेते मी.
तुझ्या मिठीत एक
नवे आयुष्य जगते मी.
जगण्याचे सारे नियम
बदलुन जातात,
जेव्हा तुझ्या डोळ्यांत
माझे डोळे मिसळून जातात.
कधीही न सुचलेले शब्द
मग ओठांवर येतात.
आणि तुझ्या ओठांवरुन
ओझरु लागतात.
काही जन्म असेच घ्यावे.
मरणही ज्यात नेहमी फुलावे.
नेहमी एक जन्म द्यावा मला.
विसरुनी तुझी दुनियादारी,
एकदा बरसु दे डोळ्यातुन तुझ्या!
5 टिप्पणी(ण्या):
जियो ........
Simply Great....जियो :)
आभार पाटील साहेब !
धन्स ! सुहासा!
NICE POEM
टिप्पणी पोस्ट करा