काल लोकलमध्ये तुझी ती
नकटी मैत्रीण भेटली,
आता हिला कटवायचं कसं
या विचारात असतानाच,
मेली माझ्या शेजारीच खेटली!
एक नंबरची नटवी!
नेहमी चावते रे सटवी!
उगाच इकडचे तिकडचे विषय झाल्यावर
नेहमीप्रमाणे तुझ्यावर आली!
कसा आहे गं तो? दिसला नाही बरेच दिवस!
फोन पण नाही त्याचा??
हिला काय करायचं असतं रे तुझ्याशी?
उगाच खेळत राहते मेली माझ्या जीवाशी!
साली, या ना त्या कारणाने
सारखं तुझं नाव घेत राहते.
मग तू असा, तू तसा,
सारखी मला जळवत राहते!
कधी कधी वाटतं आयला
हिला एकदा कोपच्यात घ्यावे
चांगले दोन तीन खवडे दयावे!
हसु नको साल्या, माहित आहे मला
आता तू मला समजावशील....
मी तुझाच आहे गं राणी,
बोलुन मला कवटाळशील!
काय तुझ्या त्या गवळणी?
आणि तू काय त्यांचा कान्हा?
दोन खवडे तुलाही देईन साल्या,
जर गेलास त्या सटवीच्या मागे पुन्हा!!
11 टिप्पणी(ण्या):
कविता आणि चित्र पाहून जे सहज सुचले ते....
असे खवडे पडल्यावर कान्हाच काय पण
कोणीही येईल लाईनीवर
कौतुक आहे त्या प्रेमाचे ठोसा खावून जे येते वळणावर
दोन खवडे तुलाही देईन
जर गेलास त्या सटवीच्या मागे पुन्हा! दीपक हे तुलाच उद्धेशुन म्हटल्या सारखे वाटते.मस्तच आहे ही सटवी
धन्यवाद रवींद्रजी !!
हे हे हे अनुजा! सही ना?? :)
नेहमीसारखं कवितेला साजेसं चित्र..पण तिला सांग घाबरू नकोस..तुझा दीपक कुठे जात नाही...(कारण दीपकची ही नवी मैत्रिण नकटी आहे बरं)
नकटी मैत्रीण ! हे हे हे !
तिला माहित आहे मी तिला सोडुन कुठेही जाणार नाही ते!
झाली बुवा एकदाची ही कविता पूर्ण... :-)
शेवट सही च झालाय... मस्त...!!! :)
मैथिली धन्स गं!!
केली एकदाची पुर्ण ! सही ना?
एकदम काटा कीर्रर्र..... सटवी
हहहहः दादा.. :)
हा हा हा ... भारीच :) :)
टिप्पणी पोस्ट करा