वादळ येतयं,
मी उभी किनार्यावर
वाळूत पाय घट्ट रोवून,
तुला माझ्या मनात ठेवून.
वादळ येतयं,
चोहोबाजुनी मला वेढतयं,
आठवणींना असं छेडतयं,
तुझ्यासाठी मन रडतयं.
वादळं येतयं,
लाटांचा मारा घेउन,
वार्याचा फेरा धरुन,
पावसाच्या सरी होउन.
वादळं येतयं,
समुद्राला उधाण भरतं,
रात्रीला भयाण करतं,
दिवसाला विराण करतं.
वादळं आलं,
मला भिरकावून दिलं
तुला गिरकावून दिलं,
आपल्याला दुरावून गेलं.
वादळं गेलं,
मी अजुनही किनार्यावर उभी
वाळूत पाय घट्ट रोवून,
तुझ्या मिठीत पुन्हा जगुन.
वादळं येईल
तुला माझ्यापासुन हिरावून नेईल,
पण तू असाच राहा,
वाळूत पाय घट्ट रोवून
तुझ्या मिठीत मला घेउन...
4 टिप्पणी(ण्या):
मस्त आहे...तीच्या मनातलं वादळ..तुझ्या मनातुन..
आभार मॅडम!
chhan aahe ...
Thanx Bandya !!
टिप्पणी पोस्ट करा