RSS

Welcome to my Blog
Hope you enjoy reading.

गुरुवार, ३० डिसेंबर, २०१०

मीरा



अशी आर्तने मीरेची,
कधी पडली का तुझ्या कानी

होउनी धुंद, लाविला छंद
तुझ्या प्रीतीने माझिया मनी.

एक तुझीच मुर्ती, भरुनी नयनी
फिरते वैराणी, होउन दिवाणी.

जाहले सरिता, वाहिले जरी का
न मिळाली यमुना, तुझ्या प्रितीची.

राधा न जरी, श्रद्धा ही तरी
प्रेमावर माझ्या, माझीच सारी.

छेडुनि तारा, गायले तराणे
वाहिल्या धारा, संदिग्ध स्वराने.

होउनी वारा, जरा स्पर्शुनी जा ना
तरसली मीरा, जरा बरसुनि जा ना !

7 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

झकास..जमली आहें कविता..
एकदम शब्द पण चपखल बसवले आहें...
आणि..."फिरते वैराणी, होउन दिवाणी" ..
"तरसली मीरा, जरा बरसुनि जा ना !"
ह्या ओळी एकदम मिराची व्याकुळता दर्शवितात...
छान..

सारिका म्हणाले...

ह्या मीराला भेटव रे एकदा...कृष्णाच्या नव्हे तुझ्या मीराला..

Deepak Parulekar म्हणाले...

माझी मीरा???
जिने माझ्यावर नाही माझ्या अस्तित्वावर प्रेम केलं तीच माझी मीरा!
मला भेटली की नक्की भेटवतो तुला ! :)

Deepak Parulekar म्हणाले...

धन्यवाद अतुल !
आभारी आहे, असाच लोभ असु दे !

Shailesh Thorat म्हणाले...

Khuuuo mastttt :)

Shailesh Thorat म्हणाले...

khup mast :)

Deepak Parulekar म्हणाले...

Thanks Shailesh.... :)

टिप्पणी पोस्ट करा